पोंदकुलवाडीतील मुंबईकरास कोरोनाची बाधा
इंदापूर: महान्युज लाईव्ह
मुंबईकरांकडून होणारा डोक्याला ताप कमी व्हायला तयार नाही, मुंबईवरून आलेल्या व पोंदकुलवाडी येथे राहत असलेल्या 42 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे त्याच्या घशातील द्रवाच्या नमुने घेतल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतरही ही व्यक्ती आत्तापर्यंत घरीच आहे. इंदापूर तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण वाढण्यास मुंबईकरांनी हातभार लावलेला आहे. बारामती व इंदापूरात सध्या वाढत असलेले रुग्ण हे मुंबईवरून आलेल्या लोकांमुळे वाढत आहेत, त्यात आज एकाची भर पडली.
बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत असलेल्या पोंदकुलवाडी येथील व्यक्ती काही दिवसांपूर्वी मुंबईहून येथे आली. त्या व्यक्तीस कुठलीही लक्षणे दिसत नाहीत, मात्र आरोग्य खात्याने पुण्या-मुंबईहून आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी केली, या चाचणीत ही व्यक्ती कोरोनाबाधित आढळली. लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्तानंतर आता कोणतीच लक्षणे नसलेल्या कोरोनाग्रस्तांमुळे इंदापूरकरांची चिंता वाढली आहे.












पोंदकूलवाडी येथे दोन रुग्ण सापडले आहेत ना