खंडाळा : महान्यूज लाईव्ह
खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 55 वर्षाच्या विवाहितेचा 25 वर्षीय युवकाने याप्रकरणी पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडाळा तालुक्यातील एका गावामध्ये विक्सच्या गोळ्या घेऊन परतणा-या 55 वर्षीय विवाहितेला पाठीमागून येत पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य 25 वर्षीय नितीन राजेंद्र रेवडे या युवकाने केले.
त्याच्याविरुद्ध पीडितेने विनयभंगाची फिर्याद पोलिसांकडे दिले त्यावरून पोलिसांनी संबंधित युवकाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे हे करीत आहेत.











