संदीप मापारी पाटील, बुलढाणा
अनेकदा बँकांबाबत आपले अनेक मतप्रवाह असतात.. बँका आर्थिक पिळवणूक करतात; व्याजदर जास्त आकारतात वगैरे, वगैरे! पण बँका सभासदांच्या हितासाठी सुद्धा काम करतात.. आता हेच बघा ना! बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा अर्बन बँक!! या बँकेने सभासदांसाठी विमा योजना लागू केलेली आहे, अनेक सभासदांना ती माहित नाही, मात्र अशाच एका सभासदाचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याच्या वारसांना या बँकेने 25 लाखांची भरपाईची रक्कम मिळवून दिली आणि त्या कुटुंबाच्या वारसदारांना दुःखाच्या डोंगरात सुखाची हिरवळ दिसली…!
बुलडाणा अर्बन संस्थेच्या लोणार शाखेच्या वतीने मयत ठेवीदार सभासदांच्या वारसाला अपघाती विमा धनादेशाचे वितरण बुलडाणा येथे करण्यात आले.
बुलडाणा अर्बन लोणार शाखेचे ठेवीदार सभासद सुभाष भुजंगराव शिरसाट (रा.पार्डा शिरसाट) यांनी शाखा लोणार येथे ठेवी ठेवल्या होत्या. दरम्यान त्यांचा शेतात शेतीला पाणी देताना विजेचा शॉट लागून दुर्दैवाने जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची माहीती मिळताच मेहकर विभागाचे विभागीय व्यवस्थापक ज्ञानेश्वर देशमाने व शाखा व्यवस्थापक गोपाल सावळे यांनी शिरसाट परिवाराची भेट घेतली.
त्यांना संस्थेच्या विमा योजनेची माहीती दिली व संस्थेच्या वतीने ठेवीदार सभासदाचा विमा काढण्यात आलेला असतो, याची माहिती देऊन यावेळी परिवाराकडुन आवश्यक ती कागदपत्राची पुर्तता करुन विमा प्रस्ताव मुख्यालयाकडे सादर केला.
आज संस्थेच्या मुख्य कार्यालयात मृत सुभाष भुजंगराव शिरसाट यांचा वारसदार त्यांचा मुलगा मयूर सुभाष शिरसाट यांना रुपये रक्कम 25 लाख रुपयांचा अपघाती विमा धनादेश बुलडाणा अर्बन चे संस्थापक अध्यक्ष भाईजी व चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर यांचे हस्ते मुख्यालय बुलडाणा येथे प्रदान करण्यात आला











