प्रदीप जगदाळे : महान्यूज लाईव्ह
बारामती : इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील आदर्श मुख्याध्यापक दिलीप काळे यांचे चिरंजीव असलेले अमित काळे यांची नुकतीच मेजरपदी नियुक्ती झाली. हा इंदापूर तालुक्यासाठी गौरवाचा व अभिमानाचा विषय आहे, तर दुसरीकडे बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथिल मुकुल इंगळे सैन्यदलात लेफ्टनंट पदावर रूजू झाले आहेत.
अमित यांच्या सैनिकी शाळेतील प्रवेशानंतर दिलीप काळे यांनी इंदापूर तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील मुलांसाठी एक विडा उचलला होता आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक मुले सैनिकी शाळेत प्रवेशासाठी पात्र ठरविले. त्यासाठी दिलीप काळे हे स्वतः शाळेचा वेळ सांभाळून, इतर वेळी या मुलांसाठी खास क्लास घेत होते. या माध्यमातून अनेक मुले सैनिकी शाळेत गेली, शिकली आणि आता मोठ्या हुद्यावर पोचली आहेत. खुर्द दिलीप काळे यांची दोन्ही मुले ही सैनिकी शाळेतूनच पुढे उच्च पदावर पोचले आहेत अमित यांनी करणार लेफ्टनंट आणि आता मेजर पदी मिळवलेली बढती ही इंदापूर तालुक्यासाठी कौतुकाची बाब बनली आहे.
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथिल मुकुल इंगळे सैन्यदलात लेफ्टनंट पदावर रूजू झाले. शालेय जीवनातच लष्करात अधिकारी होउन देशसेवा करण्याचे ध्येय निश्चित केलेल्या मुकूंद यांनी त्यासाठी कठोर परिश्रम करीत आभ्यासाबरोबर शाररीक तंदुरूस्तीकडे लक्ष दिले.
यासाठी आई-वडिलांची साथ मिळाल्याने ध्येय गाठण्यात यश मिळाले. उत्तराखंडमधील डेहराडून येथे इंडियन मिलिटरी अॅकेडमीच्या 148 व्या तुकडीचा दिक्षांन्त संचालन समारंभ नुकताच पार पडला. यामध्ये देशभरातील 341 तर मित्रराष्ट्रातील 84 तरुण हे प्रशिक्षण पुर्ण करून अधिकारी पदावर रूजु झाले. यामध्ये मुकुल इंगळे यांचा समावेश होता. काळे यांच्या कुटुंबात लष्कराची कोणतीही पार्श्वभूमी नाही.











