सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील बावडा येथे 17 जानेवारी 2021 रोजी संजय महादेव गोरवे याचा संगनमताने खून करण्यात आला होता. खून करून त्याचे हात, पाय आणि डोके कापून भीमा नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह फेकून दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले होते, मात्र दोघे जण फरारी होते. या दोघा जणांना पुण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज अकलूज मध्ये पकडले.
इंदापूर तालुक्यातील बावडा येथे 17 जानेवारी रोजी दादा कांबळे याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करून मंजुषा महादेव गोरवे (वय ५१ वर्षे रा.टाकळी टेंभुर्णी ता.माढा जि.सोलापूर) यांचा मुलगा संजय महादेव गोरवे यास त्याचे मित्र लकी विजय भोसले व महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे यांच्या मध्यस्थीने बोलावुन घेतले व कुटुंबातील सरूबाई, सुष्मिता व काजल यांचेशी संजय याची जवळीक संबध असलेचा संशय घेवुन संगनमत करून बावडा गणेशवाडी गावचे हद्दीत संजय यास धारधार हत्याराने जिवे मारले.
त्याचे दोन्ही हात, पाय व डोके कापून कोठेतरी फेकुन देऊन मृतदेह (धड) भिमानदीच्या पात्रात त्याची ओळख पटु नये याकरीता फेकुन दिले होते. अशी फिर्याद मंजुषा गोरवे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दिली होती त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयात यापूर्वी ३ आरोपी अटक करण्यात आलेले होते. गुन्हयातील निष्पन्न असलेले उर्वरीत दोघे आरोपी हे गुन्हा घडले पासून फरार होते.
याबाबत पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना, १५ जून २०२१ रोजी LCB पथकास या गुन्हयातील फरार दोघे आरोपी हे अकलूज (जि.सोलापूर) येथे येणार असल्याची खबर मिळाली.
त्यावरून पोलिसांनी अजय उर्फ प्रदिप प्रकाश खरात (वय २० वर्षे), प्रमोद प्रताप खरात (वय २१ वर्षे दोघे रा.माळशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर) यांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही आरोपींची वैदयकिय तपासणी करुन त्यांना पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.
पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक सचिन काळे, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, जनार्दन शेळके, गुरु गायकवाड, अभिजित एकशिंगे, राजू मोमीन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, काशिनाथ राजापुरे आदींनी केली.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट
सपोनि सचिन काळे,
पोहवा. महेश गायकवाड,
पोहवा. निलेश कदम,
पोहवा. सचिन गायकवाड,
पोहवा. सुभाष राऊत,
पोहवा. जनार्दन शेळके,
पो.ना. गुरु गायकवाड,
पो.ना. अभिजित एकाशिंगे,
पो.ना. राजू मोमीन,
पो.ना. मंगेश थिगळे,
पो.ना. अजित भुजबळ,
चा.पोहवा. काशिनाथ राजापुरे
यांनी केलेली आहे.











