मुंबई : महान्यूज लाईव्ह
आज मोसमी पावसाच्या पहिल्याच रट्ट्यात मुंबई घायाळ झाली. मुंबईत सखल भागात पाणी साचले. अनेक रेल्वे व लोकल सेवा रद्द कराव्या लागल्या. अशाच स्थितीत पाऊस जोरदार पडत असतानाच दुसरीकडे समुद्रात हायटाईड म्हणजे ४ मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने पुढील चार दिवस मुंबईत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आज सकाळपासून पडत असलेल्या पावसानेच मुंबईकर हवालदिल झाले आहेत. त्यात आता हवामान विभागाने हायटाईडचा मुंबईला इशारा दिला आहे. समुद्रात ४ मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार असल्याने एकीकडे पाऊस व दुसरीकडे खवळलेला समुद्र यामुळे मुंबई अधिकच तुंबणार आहे असे संकेत मिळत आहेत.











