विशाल कदम: महान्यूज लाईव्ह
लोणी काळभोर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे भविष्यात पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन झाडांचे पालन पोषण करावे. असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांनी केले.
थेऊर (ता. हवेली) येथे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने १००० झाडांचे वृक्षारोपण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता. ०५) करण्यात आले होते. यावेळी वरील आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त विधाते यांनी केले. यावेळी हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, राज्य साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी उपस्थित होते.
पुढे बोलताना विधाते म्हणाले की, कोरोनाच्या काळात रुग्णांना उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज भासत आहे. आपण जर झाडे लावली तर आपल्याला विनामूल्य सदैव ऑक्सिजन देत राहतील.
ग्रामपंचायतीच्या वतीने पहिल्या टप्प्यात, यशवंत सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी सांगितले की, श्रीक्षेत्र थेऊर गावाच्या विकासासाठी लागेल ते सर्वोतोपरी सहकार्य करणार आहे. तसेच येथील नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी यशवंतचे माजी संचालक पांडुरंग काळे, सरपंच शितल काकडे, मंडळ अधिकारी गौरी तेलंग, तलाठी दादासो झंजे, ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे, युवराज काकडे, ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी, विस्तार अधिकारी शिरीष मोरे, माजी उपसरपंच विलास कुंजीर, , तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सुरेश चव्हाण, अष्टविनायक पतसंस्थेचे संचालक शरद काकडे, शिवसेनेचे स्वप्नील कुंजीर, आदर पुनावाला क्लीन सिटीचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामपंचायतीने गावातील कचरा निर्मुलन करण्यासाठी घेलेल्या नवीन घंटागाडीचे पूजन व लोकार्पण यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच आदर पुनावाला क्लीन सिटीकडून येणाऱ्या कचरा गाडीचेही पूजन यावेळी करण्यात आले. मुंबई महापौर केसरी आबासो काळे यांच्या वतीने, गावातील सर्व शासकीय कार्यालये व अत्यावश्यक सेवेच्या दुकानदारांसाठी ३० सॅनिटाइझर स्टँड देण्यात आले.सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या, सयाजी देवराई फाऊंडेशनला १ लाख, मोफत झाडे देणाऱ्या प्रिसीजन अर्ग्रोटेकचे विजय शिंदे, सोमनाथ घुले व बापूसो आंबेकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.











