इंदापूर : महान्यूज लाईव्ह
बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निमगांव केतकी येथील कोविड सेंटरमधील रुग्णांना फळे व अंडी वाटप करण्यात आले.
यावेळी मखरे यांनी कोविड सेंटर मधील अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासंदर्भात लवकरच वरिष्ठ पातळीवर चर्चा करून सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. निमगाव केतकी ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब वडापुरे यांनी ॲड. मखरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी नानासाहेब चव्हाण, तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग, महेश लोंढे, नेताजी लोंढे, अमोल राऊत, सागर मिसाळ, अतिश मिसाळ, संतोष मिसाळ तसेच कोविड सेंटरमधील डॉ. देशमुख व कर्मचारी उपस्थित होते.











