इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात काल झालेल्या विविध तपासण्यांमध्ये 40 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. परवा तालुक्यात फक्त वीस जण कोरोनाबाधित आढळून आले होते. सात गेली तीन दिवस कोरोनाची रुग्णसंख्या पन्नाशीच्या आत आलेली आहे.
इंदापूर शहराचे मात्र वैशिष्ट्य असे की, तीस मेपासून इंदापूर शहरात बोटावर मोजण्याएवढेच रुग्ण आढळत आहेत. ग्रामीण भागात 41 तर शहरात फक्त चार रुग्ण ते 31 मे रोजी ग्रामीण भागात 61 तर शहरात फक्त दोन रुग्ण होते. 1 जून रोजी ग्रामीण भागात 29 तर शहरात फक्त पाच रुग्ण होते. 2 जून रोजी ग्रामीण भागात 45 तर शहरात फक्त पाच रुग्ण होते आणि तीन जून रोजी ग्रामीण भागात 20 तर शहरात फक्त 2 जणांचा समावेश होता आणि आज 4 जून रोजी ग्रामीण भागात 39 इंदापूर शहरात फक्त 1 रुग्णाचा समावेश आहे.
झालेला तपासण्यांमध्ये सणसर येथील 19 वर्षीय युवक, जाचक वस्ती येथील 34 वर्षीय महिला, न्हावी येथील 43 वर्षीय महिला, 52 वर्षे पुरुष, 22 वर्षीय महिला, भांडगाव येथील 55 वर्षीय महिला, लाखेवाडी येथील 45 वर्षीय महिला, कुर्डूवाडी येथील 50 वर्षीय महिला, लासुर्णे येथील 29 वर्षीय पुरुष, बेलवाडी येथील 24 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, पळसदेव येथील 21 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
शेळगाव येथील 18 वर्षीय युवती, भरणेवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, जंक्शन येथील अकरा वर्षीय मुलगा, 16 वर्षीय मुलगा, वालचंदनगर येथील 31 वर्षीय महिला, अंथुर्णे येथील 45 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा, शिरसाटवाडी येथील 44 वर्षीय महिला, जंक्शन येथील 44 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील 38 वर्षीय महिला, अगोती नंबर 2 येथील 54 वर्षीय पुरुष, बिजवडी येथील 32 वर्षीय पुरुष, पोंधवडी येथील 34 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
अंथुर्णे येथील तीस वर्षीय महिला, भिगवण येथील 28 वर्षीय महिला, सहा वर्षीय मुलगा, 26 वर्षीय पुरुष, डाळज नंबर 2 येथील 62 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवती, वालचंदनगर येथील 52 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, शेळगाव येथील 50 वर्षीय महिला, लासुर्णे येथील 15 वर्षीय मुलगा, इंदापूर येथील 32 वर्षीय पुरुष, कौठळी येथील 38 वर्षीय पुरुष, राजेवाडी येथील 40 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.











