मुंडे साहेबांचा लोकसेवेचा वसा आणि वारसा पुढे चालवणार – धनंजय मुंडे
मुंबई : महान्यूज लाईव्ह
‘अप्पा, ऊसतोड कामगार बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत असताना तुमच्याच नावाने ऊसतोड मजूर बांधवांसाठी महामंडळ सुरू केले आहे. ऊसतोड कामगार बांधव आणि सर्व समाजासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्य वेचेन, हा शब्द देतो. आज तुम्ही नाहीत, परंतु तुमचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणा देत आहेत. अप्पा, तुम्हाला कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन;’ अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची काल पुण्यतिथी होती त्यानिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
धनंजय मुंडे यांनी ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी राज्यातील 10 जिल्ह्यातील 41 तालुक्यात 82 संत भगवानबाबा वसतीगृहे सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. पहिल्या टप्प्यात 10 तालुक्यात 20 वसतीगृहे सुरू करण्यात येणार आहेत. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या वसतिगृहांची उभारणी करण्यात येणार आहे.











