पुणे : मैत्री म्हणलं की लोक अनेकदा वेगवेगळ्या पध्दतीने टाईम इंजाॅय करतात, मात्र पुण्यात शाळेच्या मैदानात दारु पित असताना वाद झाल्याच्या रागात थेट एकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयीत व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मृत व्यक्तीचा तो मित्र असल्याचे समजते.
राजन वय 35 असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असुन अद्यापही त्याची पुर्ण माहिती उघडकीस आलेली नाही. राजन आणि त्याच्या मित्रमध्ये वाद झाले किरकोळ वाद वाढत गेले आणि त्याच वादात राजनच्या डोक्यात फायर सेफ्टीचा लाल डब्बा घालून त्याची हत्या केली असून याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत राजन आणि त्याचा मित्र कर्वे रस्त्यावरील गरवारे प्रशाला शाळेच्या मैदानात मध्यरात्रीच्या सुमारास दारू पित बसले होते. तेव्हा हा सर्व प्रकार घडला. आज सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आला असून त्यानंतर डेक्कन पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी संशयीत आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणी डेक्कन पोलिस पुढील तपास करत आहेत.










