बारामती : महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील शिर्सुफळ येथील ( म्हेत्रेवस्ती ) शिरसाई कालव्याला जाणारी पाईपलाईन सकाळी 9 वाजता अतिदाबामुळे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. याचा फटका येथील शेतक-यांना मोठ्या प्रमाणात बसला.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता.
शेतक-यांच्या घरात शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. त्यात दोन दिवस या भागात पाऊस पडत आसल्याने अगोदरच शेतात पाणी साचले होते. त्यात आज ही पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात गळती झाली.
अचानक आलेल्या पाण्याने शेतक-यांची धांदल उडाली.. शेतक-यांच्या घरात, गोठ्यातही पाणी शिरले. रस्त्याकडेला असलेल्या चारचाकी वाहनांत पाणी शिरले. दरम्यान त्यानंतर जलवाहिनी गळती बंद करण्यात आली.











