राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत दौंड तालुक्यातील यवत येथील कांचन हॉटेलला आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत हाॅटेल मधील विविध साहित्य, वस्तू जळुन खाक झाल्या आहेत..
दरम्यान अर्धातास उलटूनही आग विझविण्यासाठी अग्निशमन बंब दाखल झाले नाही. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. पुणे सोलापूर महामार्गालगत आणि अनुराज साखर कारखाना रोडवर असलेल्या यवत येथील प्रसिद्ध कांचन हॉटेलला आज मंगळवारी (दि.१) दुपारी ३ वाजण्याच्या आसपास अचानक आग लागली.
काही क्षणातच या आगीने संपूर्ण हाॅटेलमध्ये पसरली या हाॅटेल मध्ये लाकडी आणि गवताळ तसेच ज्वलनशील साहित्य आणि वस्तू असल्याने आगीने पेट घेतला होता, बघता बघता या हाॅटेलला आगीचे भिषण तांडव पहावयास मिळाले, अर्धा ते पाऊण तास या आगीचे आणि धुराचे लोट हवेत उंच जात होते.
या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी आगीचे बंब बोलाविण्यात आले होते,मात्र अर्धा तास उलटून ही याठिकाणी अग्निशमन दलाचे वाहन आले नव्हते, या आगीत हॉटेल मधील साहित्य आणि वस्तू जळुन खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.











