विशाल कदम:-महान्यूज लाईव्ह
उरुळी कांचन :- पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कोरेगाव मूळ, उरुळी कांचनसह कुंजीरवाडी, हिंगणगाव व परिसरातील गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती सोमवारी (ता. ३१) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत कार्यालयात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र राज्य धनगर समाजसेवा संस्थेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय चोरमले यांच्या हस्ते करण्यात आले. जयंतीच्या निमित्ताने या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील १११ निराधार आणि गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जालिंदर रुपनर, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख युवराज डुबे, पुणे जिल्हा सचिव चंद्रशेखर मदने, हवेली तालुका उपाध्यक्ष धोंडीबा कोळपे, ग्रामपंचायत सदस्य नितीन लोखंडे आणि नागरिक उपस्थित होते.
हिंगणगाव (ता. हवेली) येथे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन वनरक्षक रुपावली जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष हवेली तालुकाध्यक्ष भरत भगवान गडदे, सरपंच अंकुश कोतवाल उपस्थित होते.
शूर सरदार दमाजी थोरात आणि राजमाता ग्रुप हिंगणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वनामध्ये १०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर थोरात, राहुल थोरात, माऊली थोरात, काळूराम थोरात, सत्यवान वाघमोडे, डॉ. रणजित कोळपे आणि भगवान गडदे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, पूर्व हवेलीतील थेऊर, लोणी काळभोर, आळंदी म्हातोबाची, नायगाव, पेठ या गावांमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे. जयंतीनिमित्त अनेक गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. करोनाचे नियम पाळून अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे कार्यक्रम पार पाडल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोट,
अहिल्यादेवी होळकर यांनी अतिशय धाडसाने आलेल्या संकटावर मात करून उत्तम व आदर्शरीत्या राज्य कारभार केला आहे. त्या उत्तम प्रशासक असल्याने स्वतः लढाईमध्ये सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. तसेच अहिल्याबाई होळकर या रणरागिणी राणीकडून आजच्या महिलांना त्यांचे आदर्श आणि विचार आत्मसात करण्याची खरी गरज आज आहे.
दत्तात्रय चोरमले,
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य धनगर समाजसेवा संस्था.
फोटो ओळ:- हिंगणगाव (ता. हवेली) अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करताना मान्यवर











