दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते मासुरणे हा 30 किलोमीटरचा रस्ता एकाच दिवसात पूर्ण करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. राजपथ इन्फ्राकॉन या कंपनीने हे काम 447 मजूर, 11 हजार टन बिटमन काँक्रीटच्या मदतीने केले. काँक्रीटचे मटेरियल पसरवण्यासाठी 12 रोलर, सहा पीटीआर व आठ हॉट मिक्स प्लांट व 6 पेवर मदतीला होते.
पुसेगाव मासुरणे हा रस्ता एकाच दिवसात 6 टप्प्यात बनवण्यात आला. या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. राजपथ इन्फ्राकॉनचे अध्यक्ष जगदीश कदम व त्यांचे सहकारी यांनी या संदर्भात माहिती दिली. रविवारी सकाळी सात वाजल्यापासून हा रस्ता बनवण्याचे काम सुरू केले होते.











