बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या जागतिक संकटामुळे आज राज्यात आर्थिक संकट ओढवलं आहे. तसेच लॉकडाउन असल्यामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे गरजू आणि गरीब लोकांना थोडासा हातभार म्हणून सामाजिक बांधिलकीतून मुर्टी गावातील पंधरा गरजू आणि गरीब कुटुंबांना जगताप कुटुंबियांच्या पुढाकारातून जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळाली. सोमेश्वर पोलीस ठाण्याचे फौजदार योगेश शेलार यांच्या उपस्थितीत हे जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरीत करण्यात आले. एक महिना पुरेल एवढे साहित्य असलेले हे किट वितरीत करण्यात आले.
यावेळी फौजदार शेलार यांनी सामाजिक बांधिलकीतून आपणही समाजाचं काही देण लागतो ही भावना लक्षात घेत, आपल्या आर्थिक बचतीमधून संदेश जगताप आणि मंगेश जगताप यांनी गरीब कुटुंबांना मदत केल्याबद्दल विशेष कौतुक केले.
यावेळी पोलीस हवालदार नितीन बोराडे, होमगार्ड सोमनाथ पवार, होमगार्ड असिफ शेख, भाऊसाहेब हुंबरे,पत्रकार विनोद गोलांडे, मुर्टी गावचे उदयोजक संदेश जगताप, उदयोजक मंगेश जगताप व त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता. हा उपक्रम संदेश जगताप मित्र परिवाराने आयोजित केला.