इंदापूर : महान्यूज लाईव्ह
उजनीच्या पाण्यासंदर्भात भिमानगर येथे उजनी धरणाच्या गेट वरती जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,प्रहारचे दत्ताभाऊ व्यवहारे,सुहास पाटील विठ्ठल मस्के यांच्या नेतृत्वाखाली 18 दिवस आंदोलन करुन शासनाला दखल घेण्यास भाग पाडल्यामुळे कुर्डू ग्रामस्थांच्या वतीने प्रभाकर देशमुख, सचिन जगताप यांच्यासह सहका-यांचा सत्कार करण्यात आला.
शासनाने पाच टीएमसी पाणी रद्द बाबतचा आदेश उजनी च्या गेटवरती आंदोलन करणा-या सोलापूर जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र दिल्याने अंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी कुर्डू ग्रामस्थांच्या वतीने प्रभाकर देशमुख, सचिन जगताप यांचा सत्कार केला.
याप्रसंगी कुर्डू गांवचे सरपंच संतोष जगताप, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव सुहास टोणपे, तालुकाध्यक्ष बालाजी जगताप, सचिन पराडे पाटील, कुर्डू विभाग प्रमुख श्रीकांत गायकवाड, नवनाथ गायकवाड, श्रीकांत जगताप, विजय ठेंगल, नितीन जगताप, बाळासाहेब भोसले, नारायण गायकवाड, अंकुश माहाडिक, धवल पाटील, सचिन गायकवाड , बाळासाहेब जगताप, नेताजी दळवी, संभाजी गाडे आदी उपस्थित होते











