बारामती : महान्यूज लाईव्ह
मुर्टी गावचे उपसरपंच किरण जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त गावात वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, अतुल आनंदराव गायकवाड, मोरगाव येथील सरपंच निलेश जी केदारी, मोढवेच्या सरपंच शितल वैभव मोरे, जोगवडी सरपंच सचिन सुनिल सोनवणे, मोराळवाडी सरपंच सारीका संतोष नागरगोजे, मुर्टी ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगल ईश्वर खोमणे, छाया मोरे, चेतना जगदाळे, कोमल जगताप, विकास खोमणे, सुप्रिया राजपुरे यांच्यासह गावातील तरूणाई उपस्थित होती.
यानिमित्ताने ७०-८० रोपे लावण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने वड आणि पिंपळ या दोन प्रमुख झाडांचा समावेश होता. उपसरपंच किरण जगदाळे यांनी तरुणांना नम्र आवाहन करताना प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या वाढदिवसानिमित्त कमीत कमी ५ झाडे लावावी असे आवाहन केले. संभाजी होळकर यांनी व इतर मान्यवरांनी किरण जगदाळे यांना शुभेच्छा दिल्या.











