ठाणे : महान्यूज लाईव्ह
ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या पुष्पा बोऱ्हाडे पाटील त्यांची एकमताने निवड झाली..! विशेष म्हणजे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणीही विरोध केला नाही.. कारण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षांना जिल्हा परिषदेत सत्तेत सहभागी करुन घेतले.
ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर शिवसेनेच्या पुष्पा बोराडे पाटील यांचे आज एक मताने निवड झाली. अंबरनाथच्या चरगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या बोराडे यांना अध्यक्षपदाची संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात सत्तेचे विकेंद्रीकरण करून दाखवले आहे.
या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, काँग्रेससह भाजपाला देखील सत्तेत सहभागी करून घेतल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत कोणीच विरोधात अर्ज भरला नाही. त्यामुळे आज श ठाण्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड झाली. आणि ही अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.











