विशाल कदम :- महान्यूज लाईव्ह
उरुळी कांचन : नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गणेश गुलाब चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते सरपंच कल्याणी हगवणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते.
या पदासाठी गणेश चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अजित घोगरे यांनी चौधरी यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. ही निवडणूक प्रक्रिया गुरुवारी (ता.२७) पार पडली
यावेळी श्री काळभैरवनाथ पॅनलचे प्रमुख राजेंद्र चौधरी, उपसरपंच पल्लवी गायकवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष कैलास चौधरी, प्रकाश चौधरी, दत्तात्रय बारवकर, जितेंद्र चौधरी, उत्तम शेलार, अश्विनी चौधरी, संगीता शेलार, आरती चौधरी, बाळासाहेब गायकवाड, प्रियंका गायकवाड, ग्रामसेविका स्वाती राजगुरू, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











