दौलतराव पिसाळ: महान्यूज लाईव्ह
वाई -:तालुक्यातील केंजळ येथील कोविड विलगीकरण कक्षास वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापुरकर, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
या भेटीदरम्यान प्रांताधिकाऱ्यांनी तालुक्यातील पहिले कोविड विलगीकरण कक्ष केलेबद्दल ग्रामपंचायत केंजळ व ग्रामस्थांचे कौतुक केले. भविष्यात केंजळ गावात आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी मदत करु असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सरपंच मिलन गायकवाड, उपसरपंच अमोल कदम, ग्रामपंचायत सदस्य निलेश जगताप, डाॅ.ज्योती राऊत, वाई बाजार समितीचे संचालक कुमार जगताप, तसेच शहाजी जगताप, सुभाष जगताप, जयंत येवले, रविंद्र जमदाडे, ग्रामसेवक संकपाळ, मंडल अधिकारी श्री. जाधव, तलाठी सौ. मोहीते, पोलिस पाटील वसुंधरा जगताप, आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.











