इंदापूर : महान्यूज लाईव्ह
वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर सहाय्यक निरीक्षक दिलीप पवार, फौजदार नितीन लकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत चार ब्रास वाळूसह दोन हायवा ट्रक वाळू वाहतूक करताना आढळल्याने त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली, तर वाळू मालक चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
23 मे रोजी संध्याकाळी सहायक निरीक्षक दिलीप पवार यांना काजळ भागात वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली त्यावरून त्यांनी फौजदार नितीन लकडे आणि कर्मचाऱ्यांना यावर कारवाई करण्याची सूचना केली. त्यावरून फौजदार लकडे यांनी पाहणी केली असता, काझड गावच्या हद्दीत काझड ते अकोले या रस्त्यावर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या रस्त्यावर वाहने दिसली.
त्यावरून पोलिसांनी छापा टाकला असता त्यामध्ये चार ब्रास वाळू व दोन हायवा ट्रक अवैधपणे वाळूची वाहतूक करताना आढळून आले. एक पांढरा रंगाचा टाटा कंपनीचा हायवा ट्रक (नं. MH- 12 QG-8203) आणि एक लाल रंगाचा टाटा कंपनीचा बेळगाव बॉडी कँबीन नावाचा ट्रक (नं MH 42 T 3715) आणि प्रत्येकी 4 ब्रास वाळू असा 20,80,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या घटनेत 1) अल्लाऊद्दिन खैरुद्दिन शेख (मुळ गाव रा.शिरसाव ता.परांडा जि.उस्मानाबाद सध्या रा. वाटलुज ता. दौंड जि. पुणे), 2) टाटा कंपनीच्या ट्रक (नं. MH 42 T 3715) वरील चालक संतोष पुर्ण नाव माहीत नाही( रा.मलठण ता.दौड जि.पुणे), 3) टाटा कंपनीचा हायवा नं MH- 12 QG-8203 चा मालक राजु शेंडगे (रा. वाटलुज ता.दौड जि.पुणे) 4) टाटा कंपनीचा ट्रक (नं. MH 42 T 3715) चा मालक नितीन सुनिल लवंगारे (रा. मलठण ता.दौड जि.पुणे) यांचेविरुध्द भारतीय दंड संहिता व पर्यावरण अधिनीयम कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास फौजदार लकडे हे करीत आहेत.
ही कामगिरी ही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिंलिद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, फौजदार नितीन लकडे, रमेश शिंदे, गोलांडे, जगताप, होमगार्ड पिसाळ यांनी पार पाडली.










