सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथे युवा उद्योजक सागर आमले यांनी स्व:खर्चाने सुरू केलेल्या कोविड सेंटर ला मोहोळ चे आमदार यशवंत माने यांनी शनिवार(दि२२) रोजी भेट दिली.
यावेळी आमदार यशवंत माने यांनी कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असणा-या रुग्णांची विचारपुस केली. उद्योजक सागर आमले यांनी उभारलेल्या कोविड सेंटर मध्ये रुग्णांवर केल्या जाणा-या सेवेबद्दल आमदार यशवंत माने यांनी आमले यांचे कौतुक केले. यावेळी आमदार माने यांनी या कोविड सेंटर ला मदत म्हणून ५१ हजार रुपयांचा धनादेश सागर आमले यांच्याकडे दिला.











