विशाल कदम:-महान्यूज लाईव्ह
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे निखिल कांचन युथ फांउडेशनच्या वतीने ३०० कुटुंबांना किराणा कीटचे शुक्रवारी (ता. २१) वाटप करण्यात आले.
सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाने राज्यासह देशात धुमाकूळ घातला आहे. प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतीबंधानात्मक उपाययोजना सुरु आहेत. राज्य सरकारकडून लॉकडाऊन, जनता कर्फ्यू, विकेंड लॉकडाऊन, संचार बंदी आणि जमाव बंदीसह अधिक कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि व्यवसाय बंद करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व व्यवसाय व दुकाने बंद झाल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या लॉकडाऊनच्या विखळ्यात गोरगरीब, कष्टकरी, मोलमजुरी करुन खाणारे, शेतमजूर, बांधकाम मजूर, किरकोळ छोटे – मोठे व्यवसाय करुन आपली उपजीविका चालवणारी कुटुंबे प्रचंड अडचणीत आले आहे. आणि बेरोजगार होऊन आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बेरोजगार कामगारांना समाजातील दानशूर व्यक्ती पुढे येऊन मदत करीत आहेत असे कांचन यांनी सांगितले.
दरम्यान, गतवर्षीप्रमाणे बेरोजगार कुठुंबांना जीवनाश्यक किराणा किटचे वाटप करून मदत करण्यात आली होती. त्याचप्रमाणे यावर्षीही लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एक हात मदतीचा म्हणून सामाजिक भावनेतून गोरगरीब कुटुंबांना विस ते पंचवीस दिवस पुरेल असे ३०० किराणा किटचे वाटप निखिल कांचन युथ फांउडेशनने केले. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उपाध्यक्ष शारिक सय्यद उपस्थित होते.
यावेळी अमोल मेहर , संदीप कांचन, सचिन कांचन, मयूर सांगले आणि निखिलभैय्या कांचन युथ फांउडेशनचे सभासद उपस्थित होते.











