इंदापूरात कॉंग्रेस पक्षाच्या वतीने खा.राजीव सातव यांना श्रद्धांजली
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
जिल्हा स्तरापासून राजकीय क्षेत्रात आपले नशीब आजमावत जिद्द व कर्तुत्वाच्या जोरावर अल्प काळात राष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करणारे खासदार राजीव सातव यांच्याबद्दल संपूर्ण देशात कुतुहल होते. महाराष्ट्रासाठी ते एक अभिमान होते. पुढील काळात देशासाठी व काँग्रेस पक्षासाठी त्यांच्याकडून मोठे योगदान अपेक्षित होते अशी मत इंदापूर तालूका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी व्यक्त केले.
आज इंदापूर शहरात खा.राजीव सातव यांची काँग्रेस पक्षाच्या वतीने शोक सभा आयोजित केली होती.यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा.राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी सावंत बोलत होते
यावेळी बोलताना इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा.राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले आहे. जिल्हा पातळीपासून राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व कर्तबगारीच्या बळावर अतिशय कमी वेळेत राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारे खा. राजीव सातव यांच्याबद्दल संपूर्ण देशात कुतुहल होत.
सावंत म्हणाले, इंदापूर तालुका काँग्रेसचा मी अध्यक्ष असताना राजीवजी सातव हे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते व महाराष्ट्राचे अध्यक्ष मा आमदार विश्वजीत दादा कदम होते. निश्चितच जवळपास महाराष्ट्रातील सर्वच कार्यक्रमला राजीवजी सातव असायचे, त्या मुळे पक्षाच्या निवासी शिबिरात त्यांचे काम बघण्याची संधी खूप जवळून आली. त्यांचे विचार, त्यांची संघटनेवरील निष्ठा व काँग्रेस पक्षावर असणारे प्रेम ह्यातून निश्चितीच माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळाली. आज त्यांच्या जाण्याने पक्षाची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे .
या वेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस झकीरभाई काझी, इंदापूर तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष सीमा कल्याणकर, इंदापूर शहर अध्यक्ष चमनभाई बागवान, तालुका उपाध्यक्ष व संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य आबासाहेब निंबाळकर, खजिनदार भगवान पासगे, तालुका सरचिटणीस निवास शेळके, तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.











