औदुंबर क्षीरसागर : महान्यूज लाईव्ह
मांगी गावचे करमाळा येथील प्रसिद्ध व्यापारी
श्री कांतीलाल हिराचंद संचेती (वय 64 वर्षे) यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले
त्यांचे अचानक जाण्याने मांगी गावावरती शोककळा पसरली आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कांतिभाई यांचे खूप मोठे योगदान होते. दिवंगत दिगंबर बागल यांचे ते अत्यंत विश्वासू कार्यकर्ते होते. अत्यंत कष्टातून त्यांनी त्यांचे विश्व उभे केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मूले, सुना व नातवंडे असा परीवार आहे.











