दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
भारतात कोरोनाच्या दूसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे, हजारो मृत्यु झाले आहेत. त्यात वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने देखील मृत्यु होत आहेत. अशावेळी सामाजिक हातभार म्हणून वाईतील जैन समाजाने अक्षय तृतीयेला जैन युवकांनी एकत्र येऊन (Oxygen concentrator) ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे दान करून ती कोरोना रूग्णांकरीता विनामूल्य उपलब्ध करुन दिली आहे.
ही मशीन किशोर ओसवाल, सुरेश छगनलाल ओसवाल यांनी स्वर्गीय छगनलाल ओसवाल यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिम्मित्त, प्रतीक जैन यांनी स्व.भरत जैन यांच्या स्मरणार्थ तर राजू ओसवाल, सनी ओसवाल, जितु ओसवाल यांनी स्वनिधीतून ही मशीन नगरसेवक दिपक ओसवाल व नगरसेवक चरण गायकवाड यांचेकडे सुपूर्त केली.
लोकार्पण केल्यानंतर दहाच मिनिटात गरजू रुग्णाच्या नातेवाईकांनी ही मशीन नेऊन लागलीच उपयोगात आणली.
यापूर्वी देखील दोन ऑक्सिजन काँन्संटे्टर मशीन मोहनलाल शेलाजी ओसवाल परिवाराने देखील जैन समुदायास सुपुर्त केले आहेत. ते देखील रुग्ण सेवेत उपलब्ध आहेत.
वाईकरांना आवाहन
Oxygen concentrator ची आवश्यकता भासल्यास वरील कोणासही संपर्क साधुन विनामूल्य उपलब्ध होईल. आजअखेर जैन समुदायामार्फत ५ ऑक्सिजन काँन्सटे्टर विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आले आहेत व गरज भासल्यास ऑक्सिजन काँन्स्न्ट्रेटरची वाढ करण्याचा देखील समुदायाचा मानस आहे.
माहिती जास्तीत जास्त शेयर करावी जेणें करून गरजू पेशंटना मदत होईल व एखाद्याचा
प्राण देखील वाचू शकतो .
.











