• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वीर धरणावर फिरायला येणाऱ्यांना लुटत होती इंदापूर तालुक्यातील गुन्हेगार टोळी! या टोळीसह माळशिरस तालुक्यातील लूटमार करणाऱ्या टोळीला देखील लावला मोक्का!

Maha News Live by Maha News Live
May 17, 2021
in यशोगाथा, सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

खंडाळा : महान्यूज लाईव्ह

खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसर आणि वीर धरणावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांना इंदापूर तालुक्यातील एक तावशी गावातील टोळी सातत्याने लुटत होती. या टोळीला पोलिसांनी जानेवारी महिन्यात बेड्या ठोकल्या होत्या, तर फलटण ग्रामीण च्या हद्दीत देखील लूटमार करणारी माळशिरस तालुक्यातील एक टोळी पोलिसांनी गजाआड केली होती. या दोन्ही टोळ्यांना कोल्हापूर परिक्षेत्राच्या परवानगीने मोक्का लावण्यात आला आहे.

खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरात आणि वीर धरणाच्या परिसरात पर्यटक फिरण्यासाठी येतात त्यातील जोडपी हेरून त्यांची लूट करण्याचा प्रयत्न इंदापूर तालुक्यातील एक टोळी करत होती. या टोळीला जानेवारी महिन्यात शिरवळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या या टोळीवर मोक्का लावण्याची शिफारस देखील करण्यात आली होती ती शिफारस कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी मंजूर केले असून आता या टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे.

    शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी पाठवलेल्या प्रस्तावामध्ये टोळी प्रमुख महावीर सुखदेव खोमणे, सदस्य शाहरूख महमुल्ला बक्षी, अमिर मौलाली मुल्ला, भैय्या हुसेन शेख, मयूर अंकुश कारंडे (सर्व रा. तावशी,ता.इंदापूर, जि.पुणे) याच्यासह एक अल्पवयीन युवकाचा यामध्ये समावेश आहे.

या टोळीने जानेवारी महिन्यात शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वीर धरणावर फिरायला आलेल्या पर्यटकांना लुटून त्यांच्याकडील किंमती ऐवज लुटून नेला होता. शिरवळ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर वरील सर्व संशयितांना अटक करण्यात आली होती.

त्यांच्यावर सोलापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी असे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आल्याने शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी  त्यांच्याविरोधात मोक्काचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल  यांच्यामार्फत कोल्हापूर येथील पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाला मनोजकुमार  लोहिया यांनी मंजूरी दिली आहे. 

तर फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी  प्रस्ताव पाठवलेल्या टोळीतील आप्पा उर्फ रवि ज्ञानदेव माने (रा. तामशेतवाडी, ता.माळशिरस,जि.सोलापूर), सदस्य पप्पू उर्फ सुहास किसन सोनवलकर (रा. वडले,ता.फलटण) यांनी सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, पुणे आणि मुंबईत देखील जबरी चोरी, दरोडा, घातक हत्याराचा धाक दाखवून खंडणी मागणे यासारखे गुन्हे केले होते. हे उघडकीस आल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी पोलिसांनी त्यांच्याविरोधात मोक्काचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल  यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाकडे पाठवला होता. त्या प्रस्तावालाही मनोजकुमार लोहिया यांनी मंजुरी दिली आहे. 

या कारवाईसाठी फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे, पोलीस हवालदार वैभव सूर्यवंशी, आप्पासाहेब कोलवडकर व फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख, पोलीस हवालदार गणेश वरखडे, राजू फडतरे या  अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Next Post

कोरोना लसीकरण मोहिमेचे दौंडज येथे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group