मुंबई: महान्यूज लाईव्ह
चौथ्या लॉकडाऊनची घोषणा सरकारने काही वेळापूर्वीच केली असून आता या लॉकडाऊनमध्ये नेमके काय सुरू ठेवायचे आणि बंद करायचे याची नियमावली जाहीर केली आहे.
आता राज्यात काय सुरू राहील?
टपाल कार्यालये, दवाखाने, जनावरांचे दवाखाने, पेट्रोलपंप, गॅस वितरण संस्था, औषधे, बि-बियाणे, अन्नधान्याची दुकाने, औषध कंपन्या, शेती उत्पादन व प्रक्रिया करणारे उद्योग- संस्था, तेल व उत्पादन करणारी आस्थापने, दुध, भाजीपाला, फळे, अंडी, बेकरी उत्पादने, मासे, मांस यांची विक्री व साठवणूक करणारी दुकाने. ऑनलाईन डिलिव्हरी सेवा. सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमे. अन्नधान्यांवर प्रक्रिया करणारे सर्व उद्योग, बॅंका, एटीएम, विमा कंपन्या, फायनानस कंपन्या, मोबाईल कंपन्या, मोबाईल दुरूस्ती, इंटरनेट पुरवठा करणाऱ्या आस्थापना, सर्व शासकीय कार्यालये सुरू राहतील, मात्र किमान कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहील, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातील. कार्यालयाच्या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करणे बंधनकारक राहणार आहे.
काय राहणार बंद?
सर्व प्रकारच्या लोकल रेल्वे सेवा, खासगी बसेस बंद राहतील. रिक्षा- टॅक्सी सुरू, मात्र टॅक्सीत दोन तर रिक्षात एका प्रवाशांपेक्षा अधिक जणांची वाहतूक करता येणार नाही. जीवनावश्यक उत्पादनांची वाहतूक करणाऱ्या वाहनात चालकासह फक्त दोन व्यक्तींना प्रवास करता येईल.
अर्थात सर्व नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई असून अत्यावश्यक कामे असल्याखेरीज कोणासही बाहेर पडता येणार नाही. होम क्वारंटाईन केलेल्या लोकांनी नियम पाळावेत. अन्यथा दंड अथवा शिक्षेची कारवाई केली जाईल. सर्व प्रार्थनास्थळे बंद राहतील. अत्यावश्यक सेवेची आस्थापना वगळता इतर सर्व दुकाने, कार्यालये, कंपन्या, उत्पादन कंपन्यांची कार्यालये बंद राहतील.











