विशाल कदम:- महान्यूज लाईव्ह
उरुळी कांचन : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने लक्षात येताच, स्वखर्चातुन रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देणारे प्रकाश धारिवाल यांच्या वतीने कोरोना बाधीत रुग्णांसाठी आवश्यक असलेले औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या औषधांची किंमत जास्त असल्याने सर्व सामान्यांना ती घेण्यास परवडत नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधनात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आमदार अशोक पवार यांनी केले आहे.
कोरेगावमुळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील य इनामदार वस्ती येथे यशोदा मंगल कार्यालयात सर्व सामान्य ग्रामस्थांसाठी सुसज्ज १०० बेडचे कोविड सेंटरचे लोकार्पण सोहळा सोमवारी (ता.१०) आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. त्यावेळी बोलताना पवार यांनी वरील विचार मांडले. यावेळी प्रांताधिकारी सचिन बारवकर, अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, तालुका वैद्यकीय अधिकारी सचिन खरात, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती अमित कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर उपस्थित होते.
पूर्व हवेलीत कोविड सेंटरला यशोदा मंगल कार्यालयाचे मालक अमोल भोसले यांनी मोफत कार्यालय उपलब्ध करुन दिले आहे. सरपंच विठ्ठल शितोळे व त्याचे सहकारी यांनी गेली आठ दिवस कोविड सेंटर चालू करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. आमदार अशोक पवार तसेच माजी सभापती सुजाता पवार यांच्या प्रेरणेतून – ग्रामपंचायत कोरेगावमुळ – लोकसहभाग व रावलक्ष्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना सेंटर उभारण्यात आले आहे.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सुचिता कदम, सरपंच विठ्ठल शितोळे, मंडळ आधिकारी दिपक चव्हाण, उपसरपंच मनिषा कड, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड, उरुळी कांचनच्या उपसरपंच संचिता कांचन, पोलीस पाटील वर्षा कड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, माजी सरपंच आण्णा महाडिक, जानाई डेव्हलपर्सचे सागर कांचन, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, ग्रामपंचायत सदस्य बापुसाहेब बोधे, भानुदास जेधे, मंगेश कानकाटे, दत्तात्रय काकडे, सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र चौधरी, विद्यार्थी तालुका अध्यक्ष सनी चौधरी, यशोदा मंगल कार्यालयाचे मालक अमोल भोसले, संतोष काकडे, आप्पा कड, माजी चेअरमन अमित सावंत, जयसिंग भोसले, चिंतामण कड, संतोष काकडे, प्रविण शितोळे, सुरेश वाळेकर, सचिन निकाळजे, सरपंच सचिन सातव, राजेंद्र भंडारी, अर्जुन कांचन तसेच महसूल विभागाचे व आरोग्य विभागाचे कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











