इंदापूर :महान्यूज लाईव्ह
इंदापूर शहरातील अहमद रजा सोशल फौंडेशन भरतशेठ शहा व ॲड. राहुल मखरे मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने तब्बल दोनशे मुस्लिम कुटुंबांना रमजान ईदच्या सणाच्या निमित्ताने शिरखुर्मा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. अशी माहिती रियाज बागवान व वसीम शेख यांनी दिली.
कोरोनामुळे महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. लॉकडाउनमुळे अनेक उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम धंदा नसून उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबांना ईदचा हा आनंदोत्सव इच्छा असूनही साजरा करण्यात अडचणी येतात. त्यामुळे अशा कुटुंबांमध्येही ईद आनंदाने साजरी होण्यासाठी सामाजिक जाणिवेतून अहमद रजा सोशल फौंडेशन, भरत शहा व ॲड.राहुल मखरे मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने मदतीचा हात दिला आहे.
रमजान ईद साजरी करताना वैशिष्ट्यपूर्ण शीरखुर्मा या खाद्यपदार्थासाठी लागणारे काजू, बदाम, पिस्ते, शेवया, खोबरे, साखर, खजूर,चारोळे तसेच विविध प्रकारच्या डाळी व साहित्याचे दोनशे कीट यंदा गरजूंनपर्यंत पोहोचवण्यात आले. त्यामुळे या सर्व कुटुंबांची रमजान ईद उत्साहात साजरी होईल अशी खात्री रियाज बागवान व वसीम शेख यांनी दिली.
गतवर्षीदेखील कोरोनाच्या उद्रेकामुळे मेटाकुटीला आलेल्या गरजू व सर्वसामान्य वर्गातील मुस्लिम समाजातील कुटुंबांना रमजान ईद आनंदाने साजरी करता यावी यासाठी सदरील सामाजिक संस्थेकडून शिरखुर्मा साहित्याच्या किटचे वाटप करून आनंद द्विगुणित केला गेला होता.











