माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – भोर येथील ध्रव प्रतिष्ठानचे राजीव केळकर यांच्या वतीने कांबरे येथील तमाशा कलावंताना किराणा व धान्याचे किट देऊन मदत करण्यात आली, तसेच आगामी काळात तमाशा फड सुरु करताना देखिल ठोस मदत करण्याचे आश्वासन या वेळी कलावंताना प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले आहे.
भोर तालुक्यातील टिटेघर येथील ध्रव प्रतिष्ठानचे राजीव केळकर यांनी भोर तालुक्यातील तमाशा कलांवंताची माहीती घेऊन त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आत्तापर्यंत त्यांनी तालुक्यातील २७ महिलांसह १४३ तमाशा कलावंताना त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन अन्नधान्य किट, काही कपडे व काही ठिकाणी रोख स्वरूपात आर्थिक अशी मदत केली आहे.
गुरुवार (दि. ६ रोजी) त्यांनी कांबरे येथील प्रसिध्द कांबरेकर तमाशा मंडळाच्या दहा कलाकारांना केळकर यांनी भेट देऊन त्यांच्या सद्यस्थितीची माहीती घेतली व प्रत्येक कुटुंबांना एक अऩ्नधान्याचे किट देण्यात आले. यावेळी चर्चा करताना त्यांच्या पुढची पिढी काय शिकते आहे, शालेय शिक्षण घेत आहे कि नाही, याची देखिल माहीती घेतली.
अगामी काळात नव्याने तमाशा उभा करताना येणाऱ्या अडचणीच्या वेळी देखील काही ठोस मदत करण्याचे केळकर यांनी यावेळी आश्वासन दिले आहे. यावेळी ध्रुव प्रतिष्ठानचे शेखर भडाळे व राहुल खोपडे उपस्थित होते. कलावंत रणदीप कांबरेकर, नाना कांबरेकर, भगवान शेलार, रघुनाथ कांबरेकर, कोंडीराम मोरे, पोपट शेलार, दादा शेलार, सुबल यादव, बाबु कांबळे यांना ही मदत देण्यात आली.
राजीव केळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले कि, आपले मनोरंजन करुन पोटधरुन हसायला लावणाऱ्या या कलाकारांवर आज उपासमारीची वेळ आली आहे त्यांची ही परवड समजनंतर खुप वाईट वाटले व जे काही माझ्या प्रतिष्ठाणकडुन होणे शक्य आहे ती मदत मी करत आहे. शासनाने व समाजाने सुद्धा या कलाकारांच्या मदतीसाठी पुढे यावे असे अवाहन त्यांनी यावेळी केले. तर कांबरेकर तमाशा फडाचे मालक रणदिप कांबरेकर व नाना कांबरेकर यांनी यावेली बोलताना आज तमाशा कलावंताना खरोखच मदतीची गरज आहे सलग दोन वर्षी तमाशा न करता आल्याने कलावंतावर मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे.











