औदुंबर क्षीरसागर : महान्यूज लाईव्ह
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात गजराज नावाच्या पिसाळलेल्या हत्तीने वनविभागाच्या अधिकाऱ्याला चिरडल्याची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्य लेखापाल प्रमोद गौरकर यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.
ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील बोटेझरी भागात ही घटना घडली 6 मे रोजी संध्याकाळी घटना घडली आहे. दरम्यान वनाधिकारी कुलकर्णी यांनी गौरकर यांचा मृत्यू झालवयाची माहिती दिली. वन विभागाची टीम आणि पशुसंवर्धन अधिकारी यांनी गजराज या हत्तीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. ताडोबाच्या बोटेझरी भागात हत्ती कॅम्प असून या कॅम्पमध्ये गजराज हा हत्ती दुपारपासून आक्रमक झाला होता.
यवतमाळ जिल्ह्यातील अवनी वाघिणीच्या शोध मोहिमेत गोंधळ घातला होता, तर 16 नोव्हेंबर 2019 ला याच गजराज ने जानकीराम मसराम या 45 वर्षीय महिलेचा मोहली इथल्या हत्ती कॅम्प मध्ये हल्ला करून जीव घेतला होता. मोहलीचा हत्ती काही महिन्यांपूर्वी बोटेझरी येथे स्थलांतरीत झाला होता.











