करमाळा : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या धास्तीने शहर व गाव सोडून शेतकरी कुटुंबांनी शेतातच संसार थाटला आहे. करमाळा शहर व तालुक्यातील शेतकरी नागरिक स्वतःला जपत आहेत, आपल्याला कोरोना ची लागण होईल या भीतीपोटी अनेक कुटुंबे चक्क आपापल्या शेतात राहायास गेले आहेत . या कोरोनाने माणसातला माणूस उठवून लावले असे घडू लागले आहे.
कोरोनाच्या धास्तीने अनेक कुटुंबे गाव सोडून राहायला गेले आहेत. तालुका ठिकाणापासून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवले आहे. काम असले की, कुटुंबातील एक व्यक्ती तालुक्याला किंवा गावात जाऊन गरजेचे सामान घेते. दुसरीकडे
गाव कट्ट्यावर एकत्र बसणेही आता बंद झाले आहे. करमाळा शहरातील अनेक कुटुंबे सध्या आपापल्या गावाकडे शेतात राहावयास गेले आहेत











