बारामती : महान्यूज लाईव्ह
येथील नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने चालवल्या जात असलेल्या कोविड सेंटरवर ऐश्वर्या बेकरी च्या वतीने संशोधित व उत्पादित केलेली व सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये मागणी असलेली गव्हांकुराचे ची सात्विक बिस्किटे पुरवण्यात आली आहेत. महेश साळुंखे यांनी बारामतीत उत्पादित करून ती निर्यात केली आहेत कोणाच्या काळात रुग्णांना आरोग्यमयी नाश्ता म्हणून ही बिस्किटे देण्याचा उपक्रम त्यांनी राबवला आहे.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, तारांगण महिला वसतिगृह, टीसी कॉलेज मुलींचे वसतिगृह, राजमाता अहिल्यादेवी होळकर वस्तीगृह, रयत भवन, विद्या प्रतिष्ठान मुलांचे व मुलींचे वसतीगृह या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकरिता कोविड केअर सेंटर चालविले जात आहे. यामध्ये साधारण १००० रुग्ण याठिकाणी उपचार घेत आहेत. येथील रुग्णांचे आरोग्य चांगले रहावे, रुग्णांना कोरोनापासून मुक्ती मिळावी यासाठी रुग्णांना ऐश्वर्या बेकरीच्या वतीने साळुंके यांनी गव्हांकुराची सात्विक बिस्किटे नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांच्याकडे सुपूर्त केली.
सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात नटराज नाट्य कला मंडळ करत असलेल्या सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याचे समाधान असल्याचे महेश साळुंखे यांनी सांगितले.











