बारामती : महान्यूज लाईव्ह
मुख्यमंत्री उद्घव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवा यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत बारामती सराफ असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कोविड १९ साठी १ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश आज बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.
या वेळी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर, कार्याध्यक्ष सुधीर पोतदार, सेक्रेटरी ए. बी. होनमाने, रघुनाथ बागडे, गणेश जोजारे, महेश ओसवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते. बारामती सराफ असोसिएशनच्या वतीने भूकंपग्रस्त, पूरग्रस्त, मूकबधिर, मतिमंद, अनाथ मुलांच्या आश्रमशाळा, वृद्धाश्रम, गरीब रुग्ण, गरीब खेळाडू, बारामती तालुक्यातील हजारो नेत्र रुग्णांना चष्म्याचे वाटप असे अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत.
सध्याच्या कोरोनाच्या लढ्यातही योगदान देण्याच्या उद्देशाने खारीचा वाटा म्हणून १ लाख ११ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री निधीसाठी देण्यात आल्याचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले. सराफ असोसिएशनच्या सर्व सभासदांना प्रत्येकी ५ लिटर सॅनिटायझरचेही मोफत वाटप करणार असल्याची माहिती आळंदीकर यांनी दिली.










