इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निमगाव केतकी येथे ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर येथे रुग्णांसाठी दररोज सकाळ,संध्याकाळी हळद, लवंग युक्त मसाला दूध रुग्णांना सकाळ संध्याकाळ वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय राऊत व त्यांचे सहकारी जयकुमार राऊत, विकास राजा, अतुल होनराव, हनीफ पठाण, प्रथमेश चिखले, विपुल भागवत निमगाव केतकी येथील कोवीड सेंटरमध्ये हे मसाला दूध वाटप करण्याचा उपक्रम प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन चालू केला आहे.
हे मसाला दूध कोवीड सेंटर चालू असेपर्यंत देण्यात येणार आहे, हे तयार करण्यात आलेले मसाला दूध कोरोना रुग्णांसाठी खुप लाभदायक आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष संजय राऊत यांनी दिली.











