मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दालनात इंदापूरच्या पत्रकारांना महासंचालकांशी ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्यांवर चर्चा केली. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्यांवर राज्य सरकारने उपाययोजना आखावी, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील पत्रकारांना खूप समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे शहरी भागातील पत्रकारांना असलेली सुरक्षा ग्रामीण भागातील पत्रकारांच्या वाट्याला येत नाही. ती सुरक्षा सामाजिक, आर्थिक व एकूणच वातावरणाच्या दृष्टीने महत्वाची असते, त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांबाबत सरकारने सहानूभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुकाध्यक्ष निलकंठ मोहिते यांनी केली. महासंचालकांच्या दालनात त्यांनी महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत पत्रकार संघाचे सचिव सागर शिंदे, मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघाचे अनंत नलवडे यांनीही भाग घेतला.










