• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा माणूसच भारी : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत शितोळे यांनी केली 36 नाभिक कुटूंबांना प्रत्येकी 5 हजारांची आर्थिक मदत! जिल्ह्यात इतरांसाठी प्रेरणा!

Maha News Live by Maha News Live
April 30, 2021
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह

दौंड : कोरोनाचे निर्बंध जाहीर करताना अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या, परंतु सर्वात मोठी गोची झाली होती, ती नाभिक बांधवांची! सर्वात पहिला फटका याच समाजाला बसला. त्यामुळे सध्या नाभिक समाजाची मोठी कोंडी झाली आहे. ती जाणून घेत तालुक्यातील पाटस येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शितोळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पाटस परिसरातील तब्बल 36 नाभिक कुटूंबांना प्रत्येकी 5 हजार रूपये असे तब्बल 1 लाख 80 हजारांची रोख मदत केली आहे.

त्यांच्या उपक्रमांचे पाटस परिसतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा पुणे जिल्ह्यातील पहिला उपक्रम आहे. दौंड तालुक्यात पहिल्यादांच नाभिक समाजाला आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी धावून जाणारे प्रशांत शितोळे पहिले व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्या कार्याबद्दल दौंड नाभिक संघटनेने आभार मानले आहेत.

कोरोना पार्श्वभुमीवर मागील वर्षापासून देशात आणि राज्यात महामारी सुरू झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेवून राज्य सरकारने मागील वर्षाप्रमाणे यंदाही संचारबंदी आणि लॅाकडाऊन केले. त्याची अमंलबजावणी ग्रामीण भागातही सुरू झाली,मात्र या महामारीत गोरगोरीब आणि हातावर पोट असलेल्या अनेकांवर कुटंबांचा उदानिर्वाह कसा करायचा असा प्रश्न पडला आहे.

अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थीत कोणीही मदतीला धावत ऩसल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. कोरोना महामारीचा आणि लॅाकडाऊन याचा मोठा फटका ग्रामीण भागातील नाभिक समाजाला बसला. ग्रामीण भागातील छोटेमोठे सलून व्यवसाय मागील वर्षाप्रमाणे यंदाही बंद आहेत.

मागील वर्षापासून नाभिक संघटना सरकारकडे आर्थिक मदत करण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. मात्र सरकाराकडून अद्याप तरी त्यांच्या मागणीचा विचार केला नसल्याने नाभिक समाजात नाराजी आहे. ग्रामीण भागातील अनेक नाभिक समाजाची सलून दुकाने ही भाडे तत्वावर आहेत. त्यांचे मागील वर्षापासून भाडे थकले आहे. मात्र त्यांना हे भाडे संबंधित मालकांना आजना उद्या द्यावेच लागणार आहे. अशातच दुकाने बंद असल्याने आर्थिक संकटाला जावे लागत आहे.

कुटुंबांचा आणि मुलांच्या शिक्षणांचा प्रश्न कसा सोडवावा हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. अशावेळी कोणीच मदत करीत नाही, मग मदतीची अपेक्षा कोणाकडून करायची ? मात्र नाभिक समाजाची परिस्थिती लक्षात घेऊन, त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पाटस येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि समाजिक कार्यकर्ते प्रशांत शितोळे पुढे सरसावले. त्यांनी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आणि लगेच नाभिक समाजातील काही प्रमुख कार्यकत्यांची चर्चा करून पाटस परिसरातील सलून व्यवसायिकांची नावांची यादी तयार करून त्यांना प्रत्येकी 5 हजार असे तब्बल 1 लाख 80 हजारांची आर्थिक मदत करून त्यांना हातभारर लावल.

दरम्यान, याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शितोळे म्हणाले की, लॅाकडाऊनमुळे सध्या मागील वर्षापासून त्यांची याचा विचार करून त्यांना थोडा आर्थिक हातभार लावावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही स्वार्थ न ठेवता केवळ माणूसकी जपण्यासाठी 36 कुटूंबांना 5 हजार रूपयांची आर्थिक मदत केली. इतर दानशुर व्यक्तींनी ही आपल्या परिसरातील नाभिक समाजाला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येवून सढळ हाताने मदत करावी.

याबाबत दौंड तालुका नाभिक संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश सांळूखे म्हणाले, पहिल्यांदाच नाभिक समाजाच्या भावनांचा विचार करून आर्थिक संकटात सापडलेल्या नाभिक समाजासाठी धावून जाणारा दानशुर व्यक्तीमत्व प्रशांत शितोळे यांना पाहिले. देवदुतासारखे त्यांनी गावगाड्यातील नाभिक समाजाला आर्थिक मदत करून मोलाचे कार्य केले. त्यांच्या या मदतीबद्दल दौंड तालुका नाभिक संघटना आभारी आहे.

यावेळी पाटस शाखेचे अध्यक्ष सुदाम गवळी,रविंद्र गायकवाड, नाना पवार,नंदा पंडीत, सुनिता पवार आदी उपस्थित होते.

Next Post

वीकेंड लाॅकडाऊन च्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरातून पोलीस पथकाचे संचलन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group