मुंबई : महान्यूज लाईव्ह
कोरोनाची आज राज्यातील रुग्णांची संख्या २४ हजार ४२७ वर पोचली. आज एका दिवसात १ हजार २६ रुग्ण आढळले. या अशा आकड्यांमुळे कोरोना राज्यात वेगाने पसरतोय हे दिसत असले आणि ते खरेही असले तरीदेखील महाराष्ट्रात कोरोनाला रोखलेय आणि जेवढे रुग्ण १४ दिवसांपूर्वी तयार झाले, तेवढे आज १४ दिवसानंतर बरे होताना दिसत आहेत. हे चित्र सुखद नाही का?
अगदी ३० एप्रिल पासून ते १३ मे पर्यंतचा आकडा जर पाहिला तर ३० एप्रिल रोजी देशात ५९ हजार ४३७ चाचण्या केल्यानंतर त्यामधून १८०१ म्हणजे अवघे ३ टक्के रुग्ण हे कोरोनाबाधित आढळून आले होते. तर ९ मे रोजी ८५ हजार ४२५ रुग्णांच्या चाचण्या केल्यानंतर २९५१ म्हणजे ३.४ टक्के रुग्ण हे कोरोनाबाधित आढळून आले. म्हणजे ३ ते ३.४ टक्क्यांच्या पुढे हे प्रमाण नाही आणि उपचारानंतर नियमित दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही ३० टक्के एवढी आहे.
एकंदरीतच दररोज बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात २५ हजार रुग्ण म्हणून टिका करणाऱ्यांनी कोरोनाला जोरदार लढत महाराष्ट्रात दिली जातेय आणि लोकांची सामूहिक प्रतिकार शक्तीही चांगली आहे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे, ज्यातून दररोजच्या वाढीव आकड्यांकडे पाहून संभ्रमित मानसिकता असलेल्या सामान्य लोकांच्या मनाला दिलासा मिळेल..!










