दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड मधील राज्य राखीव दलामागचे कोरोनाचे शुक्लकाष्ट काही संपण्यास तयार नाही. काल आठ जणांना निगेटिव्ह अहवालाने दिलासा दिला असतानाच आज पुन्हा आणखी दोन जवानांचा कोरोना विषाणूचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला.
दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम डांगे यांनी आज ही माहिती दिली. या कोरोनाबाधितांमुळे दौंड तालुक्यात कोरोना बाधितांची आजवरची संख्या २७ वर पोहचली आहे.
काल राज्य राखीव दलातील आठ जवानांनी कोरोनावर मात केली होती. यामुळे दौंडकराना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा २ जणांचे कोरोना विषाणूच्या तपासणीचे अहवाल प्राप्त झाले. दोन्ही जवानांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला. अर्थात अशी परिस्थिती असली तरी तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या नियमांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन डॉ. डांगे यांनी केले आहे.










