अर्णव गोस्वामीचा आजचा मुक्कामही तुरुंगातच..!
मुंबई : महान्यूज लाईव्ह अन्वय नाईक आत्महत्त्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आजही निर्णय झालेला नाही. सरकार पक्षाचे म्हणणे ऐकून गुरुवारी याबाबत निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामीचा आजचा मुक्कामही तळोजा तुरुंगातच असणार आहे. ...










