बारामती : महान्यूज लाईव्ह
अमेरिकेमध्ये दुसऱ्या लाटेत एकाच दिवशी दोन लाख रुग्ण आढळल्याने व युरोपातील काही देश पुन्हा लॉक डाऊन झाल्याने भारतातही दुसऱ्याला त्याची पूर्वतयारी घेतली जात आहे. महाराष्ट्रातही दुसऱ्या लाटेची भीती लक्षात घेत पूर्वतयारी करण्याच्या सूचना आरोग्य खात्याने दिले आहेत. पुण्याच्या आरोग्यसेवा संचालनालयाने यासंदर्भात कालच पूर्वतयारीच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना चे रुग्ण कमी संख्येने दिसत असले, तरी जागतिक स्तरावर मात्र युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना ची दुसरी लाट आलेली आहे. युरोपियन देशांप्रमाणेच भारतातही दुसरी लाट जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या काळात येण्याची शक्यता दिसत असल्याने जिल्हा व महापालिका स्तरावर उपाययोजना आखल्या जात आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून जागतिक आरोग्य संघटनेने दर दिवशी दर दहा लाख लोकसंख्येमागे किमान 140 तपासण्या दररोज झाल्या पाहिजेत अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातही दुसऱ्या लाटेचा सतर्कतेचा इशारा वेळेवर मिळावा यासाठी फ्लू सदृश्य आजाराचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांचा जनसंपर्क अधिक आहे अशा व्यक्तींचे विशेष सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यामध्ये छोटे व्यवसायिक गट जसे की किराणा दुकानदार, भाजीवाला, पदपथावर विविध वस्तूंची विक्री करणारे विक्रेते, हॉटेल मालक, वेटर, त्याचप्रमाणे घरगुती सेवा पुरवणारे, वर्तमानपत्र विक्रेते, मोलकरणी, गॅस सिलिंडरचे वाटप करणारे कर्मचारी, नळजोडणी दुरुस्ती, इलेक्ट्रिक विषयक कामे, इस्त्री, पुरोहित, त्याचप्रमाणे वाहतूक व्यवसायातील मालवाहतूक करणारे ट्रक चालक, टेम्पो चालक, रिक्षा चालक, वेगवेगळी कामे करणारे मजूर, जसे की, हमाली, रंगकाम, बांधकाम करणारे मजूर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील चालक, वाहक व इतर कर्मचारी, हाऊसिंग सोसायटी मध्ये काम करणारे सिक्युरिटी गार्ड, सुरक्षारक्षक, अत्यावश्यक सेवा करणारे शासकीय निमशासकीय व खासगी क्षेत्रातील पोलीस, होमगार्ड, आदी कर्मचारी अशा विविध घटकांचे गट तयार करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.
आढळणाऱ्या रुग्ण संख्येनुसार दवाखान्याची निश्चिती होणार
यामध्ये रुग्णांची तपासणी मधील शेकडा प्रमाण 60 टक्के पेक्षा कमी निघाले तर जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर पाच ते सात रुग्णालय कोरणा रुग्णालय म्हणून कार्यरत ठेवण्याच्या सूचना आहेत प्रमाण सात ते दहा टक्के असल्यास शासकीय महाविद्यालयाचे रुग्णालय तसेच तालुका स्तरावरील एक रुग्णालय कोरणा रुग्णालय म्हणून कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मात्र जर हे प्रमाण 20 टक्क्यांहून अधिक असेल तर मात्र करण्यासाठी यापूर्वी निवडण्यात आलेल्या सर्व घटकातील एक ते तीन वर्गीकरणातील सर्व रुग्णालय कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे आणि ज्यांना अति जोखमीचे आजार आहेत अशा व्यक्तींना अनलॉक नंतर ही आपला जनसंपर्क आवश्यक तेवढा आणि मर्यादित ठेवण्याची आवश्यकता आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर अति जोखमीच्या आजारावर योग्य व नियमित उपचार करण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. त्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात व शहरांमध्ये आती जोखमीच्या व्यक्तींचे आत्तापर्यंत सर्वेक्षण केलेले आहे, या व्यक्तींची यादी उपकेंद्र व वार्ड स्तरावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना देऊन त्यांची साप्ताहिक तपासणी केली जाणार आहे. अशा अनेक सूचना आरोग्य संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी दिल्या आहेत.











