• Contact us
  • About us
Friday, July 24, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंपळीत संत सोपानकाका महाराज पालखीचे मेंढ्यांच्या भव्य रिंगणाने स्वागत; परिसर भक्तिमय

mahaanewslive by mahaanewslive
July 19, 2026
in मनोरंजन, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, क्रीडा, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, प्रवास, पुणे, पुणे, Featured
0
पिंपळीत संत सोपानकाका महाराज पालखीचे मेंढ्यांच्या भव्य रिंगणाने स्वागत; परिसर भक्तिमय

बारामती : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पिंपळी (ता. बारामती) येथे पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पालखीचे विशेष आकर्षण ठरले ते काळुबाई मंदिर परिसरात शेतकरी-मेंढपाळांनी साकारलेल्या मेंढ्यांच्या भव्य गोलाकार रिंगणाचे. या अनोख्या स्वागताने वारकरी आणि भाविक मंत्रमुग्ध झाले.

बारामतीतील मुक्कामानंतर पिंपळीत दाखल झालेल्या पालखीचे स्वागत माजी सरपंच मंगल हरिभाऊ केसकर, माजी सरपंच स्वाती अशोक ढवाण आणि माजी उपसरपंच अश्विनी सुनिल बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व औक्षण करून करण्यात आले. त्यानंतर काळुबाई मंदिराजवळ सतीश केसकर, तानाजी केसकर, जयवंत केसकर, यशवंत केसकर, अर्जुन केसकर, उत्तम केसकर, आप्पा केसकर, नवनाथ केसकर, बिनू केसकर आदी मेंढपाळांनी आपल्या मेंढ्यांच्या साहाय्याने पालखीभोवती भव्य रिंगण घालत पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

पालखी सोहळा गावातील मारुती मंदिर परिसरात काही काळ विसावला. यावेळी संपूर्ण परिसर “ज्ञानोबा- तुकोबा”च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. ग्रामस्थ, महिला, युवक आणि वारकरी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पालखीचे दर्शन घेतले. वारकऱ्यांसाठी ग्रामस्थांनी त्यांच्या पसंतीनुसार पिठलं-भाकरी, भात, लोणचे आणि पापड असा पारंपरिक भोजनाचा बेत ठेवला होता. भोजनानंतर पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार महाराज यांच्यासह मान्यवरांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

त्यानंतर पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासासाठी रवाना झाला. निरोप देताना अनेक भाविकांच्या डोळ्यांत भक्तिभावाने अश्रू दाटले होते.
यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला, युवक तसेच वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपळी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पालखी सोहळ्याला भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याची सुंदर जोड लाभली.

Next Post
दुधात युरिया-डिटर्जेंटचा खेळ; भेसळखोरांवर तुकाराम मुंढेंचा घणाघात!

बारामतीतही दूधभेसळ? पोलिसांनी केलाय गुन्हा दाखल! पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहारांसह डिजिटल पुरावेही तपासाच्या रडारवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group