• Contact us
  • About us
Friday, June 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सहकार क्षेत्रात मोठी उलथापालथ; 10 वर्षांहून अधिक काळ संचालक असलेल्यांना तीन वर्षे ‘ब्रेक’ अनिवार्य! 6000 संचालक घरी बसणार! मंत्री, आमदारांचा समावेश..!

mahaanewslive by mahaanewslive
June 11, 2026
in यशोगाथा, सामाजिक, मुंबई, आरोग्य, आर्थिक, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
छत्रीधारी..

आरबीआयच्या नव्या ‘कुलिंग ऑफ पिरियड’ नियमामुळे राज्यातील हजारो संचालकांवर परिणाम; जिल्हा बँका आणि नागरी सहकारी बँकांमध्ये खळबळ

मुंबई : सहकार क्षेत्रातील दीर्घकाळ चालत आलेल्या मक्तेदारीला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि नागरी सहकारी बँकांच्या संचालक मंडळावर सलग 10 वर्षे कार्यरत असलेल्या संचालकांना आता किमान तीन वर्षे पदापासून दूर राहावे लागणार आहे. आरबीआयच्या या नव्या ‘कुलिंग ऑफ पिरियड’ नियमामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून सुमारे 6 हजार संचालकांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राज्यात सध्या 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सुमारे 434 नागरी सहकारी बँका कार्यरत आहेत. या बँकांमध्ये अनेक संचालक सलग दशकाहून अधिक काळ पदावर कायम आहेत. अशा संचालकांना आता तीन वर्षांसाठी संचालक मंडळापासून दूर राहणे बंधनकारक ठरणार आहे. आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, एखादी व्यक्ती एका सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर सलग 10 वर्षे राहिल्यानंतर पुढील तीन वर्षे त्या बँकेच्या संचालक मंडळावर राहू शकणार नाही. मात्र, या तीन वर्षांच्या कालावधीत संबंधित व्यक्तीला दुसऱ्या सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर निवडून जाण्याची मुभा देण्यात आली आहे.

आरबीआयच्या या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात नव्या पिढीला आणि तरुण नेतृत्वाला संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. दीर्घकाळ एकाच गटाच्या ताब्यात असलेल्या बँकांमध्ये नवीन चेहरे, नवीन विचार आणि अधिक स्पर्धात्मक नेतृत्व पुढे येण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांसाठी हा निर्णय धक्कादायक ठरत असला, तरी बँकिंग व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नेतृत्वातील बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने आरबीआयचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

सहकारी बँकांमध्ये अनेक ठिकाणी काही विशिष्ट व्यक्ती, कुटुंबे किंवा गटांची वर्षानुवर्षे सत्ता कायम राहिल्याची टीका होत होती. व्यवस्थापनात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी, पारदर्शकता वाढावी आणि निर्णय प्रक्रियेत विविधता यावी, या उद्देशाने आरबीआयने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
राज्यातील सुमारे 6 हजार संचालक प्रभावित
सहकार क्षेत्रातील जाणकारांच्या मते, महाराष्ट्रातील विविध जिल्हा व नागरी सहकारी बँकांमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तींची संख्या सुमारे 6 हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक बँकांच्या संचालक मंडळांमध्ये मोठे बदल दिसून येण्याची शक्यता आहे.

Next Post
मुलगी नसली म्हणून काय झाले? बारामतीतील तिन्ही मुलांनी भरली आईची ओटी; कृतज्ञतेच्या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा!

मुलगी नसली म्हणून काय झाले? बारामतीतील तिन्ही मुलांनी भरली आईची ओटी; कृतज्ञतेच्या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

June 18, 2026
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

June 18, 2026
एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

June 18, 2026
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

June 18, 2026
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

June 18, 2026
बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

June 18, 2026
अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

June 17, 2026
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

June 17, 2026
बारामती शहर पोलिसांची गोवंश वाहतुकीवर धडक कारवाई; दोन पिकअपसह चार जनावरे ताब्यात

गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या.. गोमातेची हत्या रोखा आणि म्हैस, रेड्याच्या मांसावरून होणारी तथाकथित ब्लॅकमेलिंगही रोखा..  बारामतीत कुरेशींचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन!

June 17, 2026
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

June 17, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group