पुण्यातील स्वारगेट येथील बसस्थानकावर झालेल्या बलात्कार प्रकरणातील वेगवेगळे दुवे समोर येत आहेत. त्यापेक्षाही निर्लज्जपणाचा कळस म्हणजे दत्तात्रय गाडे याची बायको त्याच्या कृत्याचे समर्थन करत आहे आणि त्याचा वकील देखील! पीडित युवतीचे एक महिन्यापासून संबंध होते आणि दोघांमध्ये पैशाचा व्यवहारही झाला होता असाही दावा केला जात होता. मात्र पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याचे कुटुंबीय त्याचा बचाव करत असले तरी देखील, यापूर्वीही एका महिलेवर त्याने बलात्काराचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. संबंधित महिलेने घाबरून हे प्रकरण पुढे नेले नाही. या महिलेने फक्त चोरीची तक्रार दिली होती. दत्तात्रय गाडे हा दिवसभर गावात थांबायचा आणि रात्री तो पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट किंवा इतर बस स्थानकावर महिला सावज हेरायचा अशी कबुली त्याने पोलिसांना पूर्वीच दिली होती.
दत्तात्रय गाडे यांने संबंधित तरुणीने तिच्या मर्जीने आपल्याशी शरीर संबंध ठेवला. मी तरुणीला शरीर संबंध ठेवण्यासाठी पैसे दिले होते असा दावा त्याच्या वकिलामार्फत केल्याचे समोर आले आहे. मात्र प्रत्यक्षात ही तरुणी त्याने दाखवलेल्या धाकामुळे जीवाच्या भीतीने गप्प राहिली आणि तुला काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव असे ती म्हणाल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
अत्याचारा वेळी तिने प्रतिकार केला नाही, कारण दत्तात्रय गाडेने अगोदर कंडक्टर असल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला होता आणि त्याने गाडीत प्रवेश केल्यानंतर दोन्ही दरवाजे बंद केले. तेव्हा गाडीत कोणीच नसल्याने ती खाली उतरत होती. मात्र त्याने तिला जबरदस्तीने सीटवर ढकलून दिले. गाडीच्या काचा बंद असल्यामुळे तिचा आवाज बाहेर आला नाही. तिचा गळा दाबल्यामुळे ती प्रचंड घाबरली. फक्त जिवंत सोडा अशीच तिने याचना केली आणि त्यामुळेच दत्तात्रय गाडेचे धाडस वाढले.
दरम्यान ही तरुणी फलटणकडे जाणाऱ्या बसच्या प्रतिक्षेत होती. मात्र ती मूळची फलटणची नसल्याचे समोर आले आहे. फलटण पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही पीडित युवती फलटणची नसल्याचे समोर आले आहे.











