दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
किसनवीर कारखान्याच्या नव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रतीपण कार्यक्रम कारखान्याचे अध्यक्ष व वाईचे आमदार मकरंद पाटील व त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मकरंद पाटील यांनी आम्ही जे जे बोललो ते ते खरं करून दाखवलं असं सांगत किसनवीर कारखान्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला.
ते म्हणाले, किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीत व कारखान्याच्या अनुषंगाने झालेल्या इतर वेगवेगळ्या कार्यक्रमात मी सातत्याने
सांगत होतो की, शेतकऱ्यांची सन २०२०-२१ मधील थकीत ऊस बील आम्ही देणार तसेच कारखानाही सुस्थितीत आणणार, याबाबतचे पहिले पाऊल पडलेले असून वार्षिक मिटींगला दिलेल्या शब्दानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत सन २०२०-२१ मधील शेतकऱ्यांची थकीत ऊस बील खात्यावर वर्ग करणार. याची सुरूवात आज विजयादशमीच्यानिमित्ताने शेतकऱ्यांना अगाऊ हप्ता देऊन करीत आहोत. त्यामुळे आम्ही जे जे बोललो, ते ते खरं करून दाखवलं आहे .
यावेळी सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, वाई तालुका सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, खंडाळा कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, बाळासाहेब सोळसकर, दत्तात्रय ढमाळ, रामराव लेंभे उपस्थित होते.
आमदार पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार हे सत्तेत सामील झाल्याने व आपण त्यांच्याबरोबर राहिल्याने
किसन वीर व खंडाळा कारखान्याला शासनाकडून ४६७ कोटी रूपयांचे कर्ज मंजुर झाले. यामुळे दोन्ही कारखान्यावरील लिलावाची प्रकिया थांवली व शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने वाचविण्यात आमचे संचालक मंडळ यशस्वी ठरले.
सन २०२०-२१ मधील थकीत ऊस बीलाची रक्कम जवळपास ५१ कोटी व सन २०२१-२२ मधील ५ कोटी रूपये देय होती. किसन वीर कारखान्यावर एवढे प्रकल्प असतानादेखील हा कारखाना फक्त आणि फक्त मागील संचालक मंडळाच्या भ्रष्टचारी व अनियिमित कारभारामुळे अडचणीत आणला होता. कारखाना बंद पडण्याच्या अवस्थेत होता. मात्र आपल्या सर्वाच्या आग्रहामुळे कारखाना ताब्यात घेतला.
शेतकऱ्यांनी दिलेल्या भाग भांडवलामुळे आपण कोणत्याही बँकेचे सहाय्य न घेता हंगाम सुरू केले. नुसते सुरू केले नाहीत, तर मागील दोन्ही हंगामातील शेतकऱ्यांचे, तोडणी वाहतुक व व्यापारी देणी देण्यास समर्थ ठरलो. शेतकऱ्यांनीही आता खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे, की काहीही नसताना आमच्या संचालक मंडळाने तुमचा एक रूपयाही बुडविलेला नाही आणि आता तर आपल्याकडे थकहमीचे पैसे आलेले आहेत.
आता बँकांची सेटलमेंट होऊन वित्तपुरवठाही सुरू होणार आहे. त्यामुळे नजिकच्या काळात किसन वीर व खंडाळा कारखान्याला पहिले दिवस येणार व ते दिवस येण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत राहणार आहोत. आपल्याला मिळालेल्या थकहमीची परतफेड आठ वर्षामध्ये करावयाची आहे. यासाठी दोन्ही कारखान्याचे मिळून दहा लाख मेट्रिक टन गाळप झाले पाहिजे व असे झाल्यास नजिकच्या ४ ते ५ वर्षात शेजारील सोमेश्वर कारखान्याचा जो भाव असेल तोच आपलाही असणार आहे.
प्रमोद शिंदे म्हणाले की, कारखान्याला चांगले नेतृत्व प्राप्त झाले की, काय बदल होतो ते आपण पाहत आहात. जो कारखाना बंद पडून लिलाव होण्याच्या मार्गावर होता, त्याला आमदार मकरंद पाटील यांच्यासारखे सक्षम नेतृत्व मिळाल्यानंतर कारखान्यात काय बदल होतो ते आपण अनुभवत आहात. मकरंद पाटील व नितीन पाटील यांच्या सातत्य व प्रयत्नामुळेच कारखान्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळालेली आहे.
बॉयलर अग्नि प्रदिपन प्रकाश लक्ष्मणराव धुरगुडे व सौ. रूपाली प्रकाश धुरगुडे (रा. भिरडाचीवाडी, वाई), रविंद्र जयसिंग जमदाडे व सौ. अनिता रविंद्र जमदाडे (रा. फुलेनगर, वाई), शिवाजी भिकू इथापे व सौ. अंजना शिवाजी इथापे रा. देगांव, वाई), श्रीरंग सगू शिंदे व सौ. मालन श्रीरंग शिंदे (रा. बर्गेवाडी, कोरेगांव), गंगाराम बाजीराव भिलारे व सौ. मंदा गंगाराम भिलारे (रा. शेते, जावली), बाजीराव कोंडीबा जाधव व सौ. मंगल बाजीराव जाधव (रा. गोवे, सातारा) यांच्या हस्ते बॉयलरचे विधीवत पुजन करण्यात आले.
कार्यक्रमास कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजी जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, सातारा सहकारी शेती औद्योगिक तोडणी व वाहतुक सोसायटीचे अध्यक्ष बबनराव साबळे, उपाध्यक्ष अजय कदम, संचालक अरविंद कदम, प्रतापराव पवार, विजय इथापे, नितीन निकम, रमेश गायकवाड, पोपट जगताप, भैय्यासाहेब डोंगरे, शुभम पवार, राजेंद्र सोनावणे, नारायण नलवडे, विक्रम पिसाळ, चरण गायकवाड, भारत चव्हाण, आनंद चिरगुटे, अमृत गोळे, अब्दुल इनामदार, शिवाजी बाबर, अॅड. शामराव गाढवे, अशोक धायगुडे, सुरेश साळुंखे, चंद्रकांत फडतरे, शशिकांत पवार, कुमार बाबर, यशवंत जमदाडे, सुरेश साळुंखे, संपत शिंदे, मंगेश घुमाळ, प्रकाश चव्हाण, चंद्रकात फडतरे, कारखाना कार्यक्षेत्रातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.











