बारामती : महान्यूज लाईव्ह
अर्थसंकल्पाने कोणाच्या पदरात काय पडले यापेक्षा चर्चा झाली, ती सोन्या चांदीच्या दराची..! तिकडे दिल्लीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट जाहीर केलं आणि इकडे बारामतीत 24 कॅरेटच्या सोन्याचा दर 73,580 रुपयावरून एकाच दिवसात 70 हजार 850 रुपये तोळ्यावर पोहोचला, तर दुसरीकडे 22 कॅरेटच्या सोन्याचा दर 67,450 रुपयावरून एकाच दिवसात 64 हजार 950 रुपये तोळा घसरला.
बारामतीतील मलाबार डायमंड अँड गोल्ड यांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरेटच्या सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 64 हजार 950 रुपये होता तर 24 कॅरेटच्या शुद्ध सोन्याचा दर 70हजार 850 रुपये प्रति दहा ग्राम असा होता. काल तोच दर 24 कॅरेटच्या शुद्ध सोन्यामागे 73 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम तर 22 कॅरेटच्या सोन्यासाठी 67 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम होता.
गेल्या काही दिवसांपासून अगदी महिन्यांपासून सोन्याच्या वाढत्या दराची सगळीकडे चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर सीमाशुल्क सहा टक्क्यावर आणल्याने सोन्या चांदीच्या दरात मोठा बदल झाला चांदी देखील 1000 रुपये किलोमागे कमी झाली











