• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बिरंगुडवाडीत बेकायदेशीररित्या पाच हजार ब्रास मुरुम व मातीचे उत्खनन? तक्रार केल्याच्या रागातून सात गुंडांकडून मध्यरात्री घरात घुसून पती-पत्नी व सासऱ्यास मारहाण!

tdadmin by tdadmin
May 20, 2024
in महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
बिरंगुडवाडीत बेकायदेशीररित्या पाच हजार ब्रास मुरुम व मातीचे उत्खनन? तक्रार केल्याच्या रागातून सात गुंडांकडून मध्यरात्री घरात घुसून पती-पत्नी व सासऱ्यास मारहाण!

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : स्वतःच्या सामायिक मालकीच्या क्षेत्रातून राजरोसपणे बेकायदेशीररित्या जवळपास 5000 ब्रास मुरूम व माती उत्खनन केल्याची तक्रार केल्याचा रागातून सात गावगुंडांनी १६ मे रोजी मध्यरात्री घरात घुसून पती-पत्नी व सासरे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घडल्या प्रकाराने सदरचे कुटुंब भयभीत झाले आहे महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप सदर अन्यायग्रस्त कुटूंबाने केला असून बेकायदेशीर उत्खनन व मारहाण केल्याप्रकरणी सात जणांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यशोदा नवनाथ सांगळे यांनी केली आहे.

यशोदा नवनाथ सांगळे (वय३५) , पती नवनाथ बन्याबा सांगळे (वय ४०) व सासरे बन्याबा बाबु सांगळे (वय ७० सर्व रा.बिरंगुडवाडी पो.कळस, ता.इंदापूर) यांना मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत यशोदा सांगळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आमच्या मालकी हक्काच्या मौजे बिरंगुडवाडी येथील समाईक मालकीच्या गटातुन (गट नं. २९५ ) शासनाची किंवा आमच्या परवानगीशिवाय जवळपास पाच हजार ब्रास मुरुमाचे व मातीचे उत्खनन केल्याचा आरोप केला आहे.

माझ्या क्षेत्रातील मुरुम का उचलत आहे,असे गटातील इतरांना विचारले व याची तक्रार मी तहसिलदार साहेबांकडे करील, असे तक्रारदाराचे पती नवनाथ सांगळे यांनी म्हटले असता, त्यांनी मला व माझे पती व सासरे यांना मारहाण व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तुला काय करायचे ते कर, माझी तहसिलदार, प्रांत, महसुल मंत्री व महसुल मंत्र्यांचे ओ.एस.डी. पर्यंत सबंध आहेत. मी मुरुम उचलण्यासाठी, तहसीलदार यांना मोठी रक्कम दिली आहे. ते तुझी तक्रार पण घेणार नाहीत उलट आम्ही तुझ्या कुटुंबावरती खोटे केसेस दाखल करु. असे दममदाटी करत आम्हाला आमच्या रानातुन मारत बाहेर काढले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. माझ्या कुटुंबाच्या जीवास काहीही धोका झाल्यास वरील तिन्ही इसम तहसिलदार, प्रांत, महसुल मंत्री व महसुल मत्र्यांचे OSD यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी यशोदा सांगळे यांच्या कुटुंबाची आहे.

सदर क्षेत्रातील माती उचलण्याची कोणतेही परवानगी नाही. तरी या गुंड प्रवृत्तीच्या माणसांवर इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी कायदेशीर करवाई करुन, फौजदारी गुन्हे व गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल करावेत अशी मागणीही करण्यात आली आहे.

यानंतर याबाबत महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हाधिकारी, पुणे खनीकर्म शाखा, उपविभागीय अधिकारी बारामती, वालचंदनगर पोलीस ठाणे जंक्शन इंदापूरचे तहसिलदार यांचेकडे तक्रारी अर्ज दिला.यानंतर बेकायदेशीर मुरूम माती उत्खनन करणाऱ्यांना हे सहन झाले नाही व दिलेल्या तक्रारी अर्जाचा राग मनात धरून, बुधवारी (दि.१६ मे २०२४) रात्री १.३० वाजता आमच्या बिरंगुडवाडी येथील घरात घुसून सात जणांनी कुटूंबातील तिघांना मारहाण करण्यात आली आहे.

त्याच रात्री २ वाजण्याच्या सुमारास वालचंदनगर पोलीस  पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता, तेथील पोलीस कर्मचारी यांनी आमच्यावर उपचार केले. जबाब नोंदवून घेतले. मात्र मारहाण करणाऱ्या गुंडांवर कोणतीही कारवाई केली नसून, त्या गुंडाकडून माझ्या कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तरी पोलिसांनी आम्हांला सुरक्षा द्यावी व त्या गुंड प्रवृत्तीच्या माणसांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या बेकायदेशीर मुरूम माती उपसा करणाऱ्यांवर खरंच महसूल व पोलीस प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Next Post
त्यांची न्युमोनियाबरोबर जगण्याची लढाई संपली.. पण तरीही बील उरले एक लाख रुपये! हतबल कुटुंबीयांसाठी अजितदादांचा फक्त एक फोन.. अन् यंत्रणा हलली..!

त्यांची न्युमोनियाबरोबर जगण्याची लढाई संपली.. पण तरीही बील उरले एक लाख रुपये! हतबल कुटुंबीयांसाठी अजितदादांचा फक्त एक फोन.. अन् यंत्रणा हलली..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group