दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील यवत येथील शेतजमीनीचा बिनताबा साठेखत करण्यासाठी दौंड येथील दुय्यम सहाय्यक निबंधक कार्यालयात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाचे झोन प्रमाणपत्र हे बोगस आणि बनावट सादर करून शासनाची दिशाभूल आणि फसवणूक केल्याप्रकरणी यवत येथील एका नामांकित दैनिकाच्या पत्रकारासह दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही माहिती दौंड पोलिसांनी दिली. संभाजी दत्तात्रय ताकवणे (रा. पारगाव ता दौड जि पुणे ), संदीप सुर्यकांत चाफेकर ( रा. यवत ता दौड जि पुणे ) व संजय मारूती दोरगे (रा. यवत ता दौड जि पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड तालुक्यातील यवत येथील
गट नं ८३६ या मिळकती बाबत बिनताबा साठेखत दस्त क्र. 2695/2020 व 2697/2020 ही दोन दस्त नोंदविली गेली होती.
त्यावेळेस दुय्यम निबंधक या पदाचा कार्यभार श्री. एस.एस.वाव्हळ यांच्याकडे होता व त्यांनी सदर दस्ताची नोंदणी केलेली आहे. यवत येथील गट नं 836 या सी क्षेत्र 00 हे 39 आर यांसी आकार 00 रु 87 पै यापैकी 00 हे 12 आर या मिळकतीबाबत श्री संभाजी दत्तात्रय ताकवणे यांनी संजय मारूती दोरगे तर्फे अ.पा.क वडील मारूती दोरगे यांचेकडून बिनताबा साठेखत अशा शिर्षकाचा दस्त दिनांक 09/10/2020 रोजी लिहून घेतला.
सदर दस्त 09/10/2020 रोजी निष्कासित केलेला असून त्या दिवशी दौड येथील दुय्यम निबंधक कार्यालय अनु क्र 2695/2020 वर नोंदविलेला आहे. तसेच सदर दस्त नोंदणी करीत असताना सदर मिळकत प्रभाव क्षेत्रात असल्याने त्याचे मुल्याकंन निश्चीती कामी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांचेकडील झोन प्रमाणपत्र आवश्यक असते. परंतु संबंधित पक्षकारांनी सदर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांचेकडील जा. क्र पी.एम.आर.डी.ए / झोन प्रमाणपत्र क्र ZC-0000-DA-19-0-03446 दिनांक 6/6/2020 हे प्रमाणपत्र सदर दस्ताचा भाग म्हणून जोडले आहे.
सदर प्रमाणपत्र दस्तातील शिक्का पान क्र 12 वर जोडले आहे. तसेच गाव मौजे यवत येथील गट नं 836 यासी क्षेत्र 00 हे 39 आर यांसी आकार00 रु 87 पै यापैकी 00 हे 12 आर या मिळकतीबाबत संदीप सुर्यकांत चाफेकर यांनी संजय मारुती दोरगे तर्फे अ.पा.क वडील मारुती दोरगे यांचेकडून बिनताबा साठेखत अशा शिर्षकाचा दस्त दिनांक 09/10/2020 रोजी लिहून घेतला सदर दस्त 09/10/2020 रोजी निष्पादीत केलेला असून त्या दिवशी दौड येथील दुय्यम निबंधक कार्यालय अनु क्र 2697/2020 वर नोंदविलेला आहे.
सदर उपरोक्त मुळ दस्ताबाबत पुणे ग्रामीण सहजिल्हा निबंधक वर्ग १ राजेंद्र शंकर ढमढेरे (रा नारायणबाग हाऊसिंग सोसायटी हडपसर पुणे) यांनी तक्रारीच्या अर्जाच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत दोन्ही दस्तामध्ये जोडले गेलेले झोन प्रमाणपत्र हे बनावट असून (संदर्भ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांनी दिलेले पत्र जा क्र पीएमआरडीए/झोन दाखला/पुणे/861/दिनांक 15/07/2021) सदर झोन प्रमाणपत्र हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांनी दिलेले नाही.
या दस्तातील पक्षकार संभाजी दत्तात्रय ताकवणे, संदीप सुर्यकांत चाफेकर व संजय मारूती दोरगे यांनी बनवले आहे. हे तपासात निष्पन्न झाले. त्यांनी बनावट कागदपत्रे लावून शासनाची फसवणुक केली. याबाबत दौंड दुय्यम निंबधक कार्यालयाचे अधिकारी अरुण नामदेव आवाड यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यामधील संदीप चाफेकर हा एका नामांकित दैनिकाचा पत्रकार आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.











